मेष

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवतेचे स्मरण आणि दर्शन करावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत्र पठण करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. गणपती स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठी भेटीचे योग. जुने मित्र-मैत्रीण भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कन्या

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेणे.
आजचा रंग- निळा

तुळ

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. लक्ष्मी दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

धनु

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. ओम श्री क्लीम भगवतैय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. खर्च संभवतो. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

सायंकाळी पाच नंतर चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे.
आजचा रंग – नारंगी

मीन

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लागतील. मारुती स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu