मेष
मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – लाल

वृषभ
मारूती मंदिरात स्त्रोत म्हणून दिवसाची सुरूवात करावी आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

मिथुन
ओम देवेभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

सिंह
शनि मारूती मंदिरात तेल व शेंदूर अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – सोनेरी

कन्या
शनि मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

तुळ
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – सोनेरी

वृश्चिक
मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

धनु
मारूतीला शेंदूर अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

मकर
मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – लाल

कुंभ
हनुमान चालिसाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
हनुमान चालिसाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu