- मेष:-
काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. भाग्यकारक घटना घडतील. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. दिवस आनंदात घालवाल. - वृषभ:-
भावंडांचे प्रश्न सोडवाल. उगाच कोणाचाही रोष ओढवून घेऊ नये. शांततेचे धोरण ठेवावे. मानसिक शांतता जपावी. जोडीदाराची बाजू जाणून घ्या. - मिथुन:-
मनाची चंचलता जाणवेल. पत्नीचे लाडीक हट्ट पुरवाल. काही ठिकाणी सखोलपणे विचार करावा. भागीदारीत फायदा संभवतो. आजची कामे सुरळीत पार पडतील. - कर्क:-
उगाचच शंका काढत बसू नका. काहीवेळा दोन पावलं मागे येण्यास कचरू नका. मानसिक समाधान शोधावे. आरोग्याची काळजी घ्यावी. थोडक्यात सतुष्टता मानावी. - सिंह:-
कामातील अडथळे दूर कराल. गोष्टी अर्धवट सोडू नका. मुलांच्या वागण्याची काळजी वाटू शकते. परिस्थितीतून मार्ग काढाल. चिकाटी सोडू नका. - कन्या:-
स्वकष्टाचा आनंद मिळेल. चांगली ऊर्जितावस्था लाभेल. आर्थिक अडचण दूर होईल. काही कामे कमी श्रमात उरकली जातील. रागावर नियंत्रण ठेवावे. - तुळ:-
व्यावसायिक अडचण दूर करावी. सामाजिक जाणीव ठेवावी. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. पायाचे त्रास जाणवतील. स्त्रियांपासून दूर राहावे. - वृश्चिक:-
धार्मिक कामात मदत कराल. जुन्या कामात अडकून पडाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. काही कौटुंबिक अडचणी येऊ शकतात. स्वतः च्या मतावर आग्रही राहाल. - धनु:-
स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी. फार चिंता करत बसू नये. पारंपरिक गोष्टींची कास धराल. जुनाट मते मांडू नयेत. - मकर:-
उगाच कोणाचीही चेष्टा करायला जाऊ नये. फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारापासून दूर राहावे. वैवाहिक गैरसमज दुर करावेत. सामाजिक वादात पडू नका. - कुंभ:-
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. काही ठिकाणी समाधान मानावे लागेल. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. चिडचिड करू नये. - मीन:-
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. बौद्धिक चुणूक दाखवाल. दिवसभर कामाची धावपळ राहील. बदलांना सामोरे जावे. चुकीच्या गोष्टीकडे मन वळू शकते.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First Published on November 2, 2019 12:09 am
Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 02 november 2019 aau 85