• मेष:-
    ध्यानधारणा करावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. उष्णतेचे त्रास जाणवतील. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
  • वृषभ:-
    भावंडाना मदत करता येईल. सहकाऱ्यांचे प्रश्न जाणून घ्याल. योग्य अंदाज बांधाल. फार विचार करण्यात वेळ घालवाल. समय सुचकता बाळगावी.
  • मिथुन:-
    प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यावे. बौद्धिक हट्ट बाजूला सारावेत. जोडीदाराचा सुस्वभावीपणा लक्षात येईल. विचारांना योग्य वळण द्यावे. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.
  • कर्क:-
    मुलांच्या वेळा पाळाव्यात. लहानांच्या धडपडीकडे विशेष लक्ष द्यावे. सेववृत्तीने मदत कराल. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. कल्पनेला चांगला वाव मिळेल.
  • सिंह:-
    कौटुंबिक कामात अधिक लक्ष घालावे. जमिनीचे व्यवहार करता येतील. वाहनांची कामे निघतील. अतिविचार अयोग्य ठरेल. मानसिक शांतता जपावी.
  • कन्या:-
    धाडसाने कामे हाती घ्याल. वैवाहिक सौख्यात रमून जाल. पत्नीचा प्रेमळपणा दिसून येईल. घरगुती जबाबदारी वाढेल. नातेवाईकांशी हितगुज कराल.
  • तूळ:-
    उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आत्मविश्वास बाळगावा. कफाचा त्रास जाणवेल. कामाला गतिमानता येईल.
  • वृश्चिक:-
    चौकसपणे वागणे ठेवावे. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वभावात काहीसा स्वच्छंदीपणा येईल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवावा.
  • धनु:-
    घरातील वातावरण प्रेमळ असेल. महिला गृहिणीपदाचा मान मिरवतील. कामातील दिरंगाई टाळावी. आध्यात्मावर अधिक लक्ष द्याल. व्यावसायिक लाभ लक्षात घ्यावा.
  • मकर:-
    भावंडांशी सलोखा वाढेल. चांगले साहित्य वाचनात येईल. छंद जोपासायला वेळ काढाल. लहान प्रवास कराल. जुन्या विषयात अडकू नका.
  • कुंभ:-
    गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडी-निवडीवर भर द्याल. लपवण्याकडे कल राहील. अधिकारी व्यक्तींना भेटाल. हौसेला अधिक महत्व द्याल.
  • मीन:-
    भावनेतून विचार कराल. वागण्यातून सज्जनपणा दाखवाल. सर्वांचे आपुलकीने कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. कमिशनमधून लाभ होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर