27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०५ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  सेवावृत्तीने काम कराल. तब्येतीत सुधारणा होईल. तुमच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले जाईल. मानापमानाच्या मागे धावू नका. हातात काही अधिकार येतील.
 • वृषभ:-
  दिमाखाने कामे कराल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी वाद संभवतात. चोखंदळपणे वागाल. ज्ञानाचा सुयोग्य वापर करता येईल.
 • मिथुन:-
  गृहशांती जपावी. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. घराच्या डागडुजीचे काम काढाल. नवीन मित्र जोडले जातील. रेस,जुगार यातून फायदा संभवतो.
 • कर्क:-
  स्वतंत्रपणे विचार कराल. कोणाच्याही मदतीशिवाय काम कराल. तारतम्य बुद्धी वापराल. आत्मविश्वास वाढेल. कामे सुरळीत पार पडतील.
 • सिंह:-
  खर्च वाढेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलताना सावधपणे शब्द वापरावेत. कौटुंबिक शांतता जपावी. चटकन प्रतिक्रिया देऊ नये.
 • कन्या:-
  उदारपणे सर्वांना मदत कराल. आपले स्वत्व राखाल. धिटाईने बोलाल. सामाजिक दर्जा वाढेल. तुमच्यातील कणखरपणा वाढेल.
 • तूळ:-
  प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. मानापमानाच्या गोष्टी मनावर घेऊ नका. सामाजिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. एकाच कामात अडकून पडाल. हट्टीपणा बाजूला सारावा.
 • वृश्चिक:-
  मानाने पैसे कमवाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे.
 • धनु:-
  आर्थिक मान सुधारेल. आपलेच मत खरे कराल. सतत प्रयत्नशील राहाल. सत्तेची अपेक्षा दर्शवाल. कामात अपेक्षित बदल कराल.
 • मकर:-
  लोक तुमचा आदर्श घेतील. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. स्वतः चा दर्जा सुधाराल. स्वभावातील मानीपणा बाजूला ठेवावा. वरिष्ठांना सामोरे जावे लागेल.
 • कुंभ:-
  काही इच्छा पुढे ढकलाव्या लागतील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अपयशाने खचू नका. तब्येतीची हेळसांड करू नये. काही कामे वेळ घालवतील.
 • मीन:-
  पत्नीच्या निश्चयाने भारावून जाल. उच्च विचार मांडाल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत वरचष्मा राहील. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 05 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०४ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X