• मेष:-
    सामाजिक जाणिव ठेवाल. नामस्मरण करावे. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उगाचच चिंता करत बसू नये. प्रवास करावा लागेल.
  • वृषभ:-
    स्त्री समुहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल. व्यवसाईक लाभावर लक्ष ठेवावे. मुलांच्या आनंदाने भारावून जाल. मनातील आकांक्षा पूर्ण कराल.
  • मिथुन:-
    कामात घाई करून चालणार नाही. एकावेळी अनेक गोष्टीत लक्ष घालू नका. मानसिक द्विधावस्था टाळावी. कामात वारंवार बदल करू नका. तुमचे कौतुक केले जाईल.
  • कर्क:-
    धार्मिक कामात सहभाग घ्याल. दानशूरपण दाखवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. कल्पना शक्तीचा वापर कराल.
  • सिंह:-
    काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. मानसिक स्थैर्य जपावे. विचारांची दिशा बदलून पहावी. योग्य वेळेची वाट पाहावी.
  • कन्या:-
    पित्ताचा त्रास जाणवेल. स्वतःच्या हिमतीवर कामे हाती घ्यावीत. कामाचा जोम वाढेल. फार हट्टीपणा करू नका. उतावीळपणे निर्णय घेऊ नयेत.
  • तूळ:-
    उत्तम विचार मांडाल. चातुर्याने कामे कराल. वाणीत गोडवा ठेवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. योग्य तर्क कराल.
  • वृश्चिक:-
    करमणुकीचे कार्यक्रम पाहायला जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. मैत्रीचे संबंध नीट हाताळा. छंद जोपासाल.
  • धनु:-
    घरातील वातावरणात मन रमेल. बागकामाची आवड जोपासाल. तुमच्यातील दिलदारपणा दाखवाल. तर्कशुद्ध विचार कराल. स्वतः चा मान जपाल.
  • मकर:-
    जवळचा प्रवास मजेत होईल. कामाला अपेक्षित वेग येईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आवडते पुस्तक वाचाल.
  • कुंभ:-
    कलेला प्रोत्साहन मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. सामाजिक भान ठेवावे. कौटुंबिक वातावरणात रमाल. गोड पदार्थ चाखायला मिळतील.
  • मीन:-
    दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मतभेद बाजूस ठेवावेत. कलेचे कौतुक केले जाईल. वाचनाची आवड जोपासाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर