• मेष:-
    जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक बाजू सुधारेल. अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक प्रगल्भता दाखवाल. काटकसर कराल.
  • वृषभ:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा मान वाढेल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. नवविवाहितांच्या अपेक्षा पूर्ण होतील.
  • मिथुन:-
    पोटाचे विकार त्रास देवू शकतात. नातेवाईकांशी मतभेद टाळावेत. कामातून समाधान मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. हाताखालील नोकरांची योग्य साथ मिळेल.
  • कर्क:-
    शैक्षणिक कामात विशेष लक्ष घालावे. ज्ञानाचा योग्य वापर कराल. तर्कनिष्ठ विचार कराल. बौद्धिक छंद जोपासाल. कामात सातत्य ठेवाल.
  • सिंह:-
    सर्व गोष्टी मनासारख्या घडतील अशी अपेक्षा ठेवू नका. उत्तम गृहसौख्य लाभेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. कोणाशीही वैर पत्करु नका.
  • कन्या:-
    कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवावा. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. आशावादी दृष्टीकोन ठेवाल. घरात कर्तेपणाने मिरवाल.
  • तुळ:-
    सांपत्तिक स्थिती सुधारेल. व्यापारीवर्गाला चांगला धनलाभ होईल. व्यावसायीक विस्ताराचा विचार करावा. अंगीकृत कार्यात यश येईल. हातात नवीन अधिकार येतील.
  • वृश्चिक:-
    खर्चाचे गणित नव्याने मांडावे. वायफळ खर्च टाळावा. दिवस मजेत घालवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. नवीन अधिकार हातात येतील.
  • धनु:-
    काही गोष्टींपासून दूर राहाल. धर्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पारमार्थिक उन्नतीचा विचार कराल. खर्चाचा विचार कराल. सामाजिक सेवेत प्रगती कराल.
  • मकर:-
    थोर लोकांचा सहवास लाभेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. काटकसरीने वागाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. सांपत्तीक दर्जा सुधारेल.
  • कुंभ:-
    तुमचा मान वाढेल. जोडीदाराचा अधिमान वाटेल. वादाच्या प्रसंगाला सामोरे जावू नका. नवीन अधिकारांची जाणीव ठेवून वागावे. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका.
  • मीन:-
    कलेतून आर्थिक प्राप्ती होईल. उपासनेत प्रगती करता येईल. संशोधनावर भर द्याल. तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बाजू बळकट कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर