• मेष:-
    सर्वाना आनंद वाटाल. महत्वकांक्षा जागृत ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. वागण्यातून सुसंस्कृतपणा दिसून येईल. उत्तम वाहनसौख्य लाभेल.
  • वृषभ:-
    अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. महिला सौंदर्य प्रसाधने खरेदी करतील. चांगला आर्थिक लाभ होईल. घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न कराल.
  • मिथुन:-
    कलेला पोषक वातावरण लाभेल. चांगले साहित्य वाचायला मिळेल. प्रकाशकांना प्रसिद्धी मिळेल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. धार्मिक वृत्ती जोपासाल.
  • कर्क:-
    काही कामे कमी श्रमात पार पडतील. रेस,सट्टा यातून लाभ संभवतो. सासुरवाडीची मदत मिळेल. विचारांना योग्य वळण द्यावे. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
  • सिंह:-
    एकमेकांतील आकर्षक वाढेल. भागदारीच्या कामात यश येईल. संपर्कातून कामे पार पडतील. पत्नीची प्रगती होईल. जोडीदाराशी समजुतीने वागाल.
  • कन्या:-
    आळशीपणा वाढेल. ऐशारामाच्या कल्पना करत बसाल. हाताखालील लोकांचे सौख्य लाभेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी वेळ द्यावा.
  • तूळ:-
    सहवासातून मैत्री वाढेल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. सहलीचे कार्यक्रम आखाल. अंगीभूत कलेला वाव मिळेल. जुगाराची आवड जोपासाल.
  • वृश्चिक:-
    घरात टापटीप ठेवाल. मोठया वस्तू खरेदी कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. सज्जनपणे घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल.
  • धनु:-
    नातलगांशी संबंध सुधारतील. काव्यस्फूर्तीला चांगला वाव मिळेल. कल्पनाशक्तीला चांगली लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भरभरून कौतुक कराल.
  • मकर:-
    आवाजात गोडवा ठेवाल. चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
  • कुंभ:-
    चारचौघात मिळूनमिसळून वागाल. आनंदी दृष्टीने पाहाल. प्रेमळ मैत्री लाभेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन दृष्टिकोन ठेवाल.
  • मीन:-
    मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. गुप्तपणे गोष्टी करण्यावर कल राहील. काही गोष्टी इच्छा नसतांना कराव्या लागतील. उगाचच बंधनात अडकल्यासारखे वाटेल. क्षणिक आनंद मिळवाल.

    ज्योतिषी विद्याधर करंदीकर