26 February 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष : वास्तूविषयक घडामोडींच्या बाबतीत आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले निर्णय योग्य ठरतील. आर्थिक घडामोडीचा व्यावसायिक जीवनावर अनुकूल परिणाम होईल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील.

वृषभ : आपल्या मातुल घराण्याकडून फायदा होईल. मित्रपरिवाराबरोबर आज खरेदीचे योग घडतील. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपल्या व्यवसायात जवळच्या नातलगाला सहभागी करुन घ्याल.

मिथुन : शैक्षणिक प्रगतीस आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या बोलण्यामुळे आप्तस्वकिय दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासयोग टाळावेत. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल.महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे.

कर्क : घरात मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. प्रवासयोगात खिसापाकिट सांभाळा. आपले मनोबल अनुकूल असणार्या घटनाघडतील. मित्रपरिवराचे सहकार्य लाभेल. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल.थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : आज आपण महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. आजचा दिवस आपल्यासाठी गुंतवणूकीस अनुकूल नाही. मानसिकअस्वास्थ जाणवेल. वैयक्तीक उत्कर्ष साधण्याच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.

कन्या : घरगुती कामासाठी आज आपल्याला प्रवास करावे लागतील. संततीसंबंधी चिंता जाणवतील. आज व्यावसायिककरारमदार करण्यास आपणांस प्रतिकूल दिवस आहे. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील.

तूळ : आपली कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने मित्रपरिवाराकडून आर्थिक सहाय्य घ्यावे लागेल. पूर्वी केलेल्या कामामुळेनोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील व पुढील महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील.

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, जबाबदारी वाढेल. आपली कर्तव्ये टाळू नका. आपली कामे करताना शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावेत. दैनंदिन कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल सुखावह ठरेल. नवनवीन कल्पना आकार घेतील.

धनु : आध्यात्मिक प्रगतीस अनुकूल दिवस आहे. सांसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. वैवाहिक जीवनातील मतभेद टाळावेत. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल.

मकर : गूढशात्राच्या अभ्यासास आजचा दिवस अनुकूल आहे. परदेशातून आलेल्या मित्रमंडळीकडून विविध प्रकारचे लाभसंभवतात. आर्थिक उलाढावीस आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल नाही. पुढे घडणार्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक – आध्यात्मिक प्रगती साधता येईल.

कुंभ : व्यावसायिक उन्नतीसाठी प्रवास करावा लागेल. नोकरीतील कामात सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. आपण केलेल्याचांगल्या कामाची प्रशंसा होईल व बढतीचे योग येतील. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.

मीन : वैवाहिक मतभेद टाळावेत. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, वरिष्ठ आपल्यावर जबाबदारीचे कामे सोपवतील. वृद्धव्यक्तिंचा सल्ला मनाविरूद्ध असला तरी ऐकावा लागेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 12 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ९ डिसेंबर २०२०
Just Now!
X