• मेष:-
    मानसिक चांचल्य जाणवेल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. फार काळजी करण्याचे कारण नाही. झोपेची तक्रार कमी होईल. सामाजिक जाणिवेपोटी काही कामे कराल.
  • वृषभ:-
    मित्रमंडळ जमवाल. जवळच्या लोकांचा सहवास लाभेल. स्वकष्टाने इच्छा पूर्ण कराल. नवीन ओळखी होतील. आर्थिक लाभाचा फायदा घ्यावा.
  • मिथुन:-
    कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. बँकांचे कामे सुरळीत पार पडेल. वडिलांची उत्तम साथ मिळेल. आर्थिक चणचण मिटेल. बढतीची चिन्हे दिसतील.
  • कर्क:-
    दूरच्या प्रवासाचा योग येईल. सर्वांशी नम्रतेने वागाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. तीर्थाटनाचा विचार कराल. उपासनेत प्रगती करता येईल.
  • सिंह:-
    मनाची स्थिरता जपावी. अचानक धनलाभाची शक्यता. शेयर्स मधून फायदा संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
  • कन्या:-
    आर्थिक प्रश्न मिटतील. स्वकष्टाचा आनंद घ्याल. कामाचा व्याप वाढेल. पुरेशी झोप घ्यावी. पित्त विकार बळावू शकतो.
  • तूळ:-
    संभाषणाची आवड जोपासली जाईल. कलेतून आर्थिक फायदा होईल. सामाजिक वादात अडकू नये. अडकलेली कामे प्रथम मार्गी लावावीत. अंगीभूत कलेला वाव द्यावा.
  • वृश्चिक:-
    पैज जिंकता येईल. रेस, सट्टा यातून फायदा संभवतो. कारमणुकीवर अधिक वेळ खर्च कराल. मित्रांचा फड जमवाल. आवडते पुस्तक वाचाल.
  • धनु:-
    घरगुती कामात वेळ जाईल. घरातील वातावरण आनंदी असेल. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला घ्याल. स्वतः साठी वेगळा वेळ काढावा. ज्येष्ठांचा आदर कराल.
  • मकर:-
    जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. काही गोष्टींचे चिंतन करावे. स्वभावात लहरीपणा जाणवेल. सामाजिक वजनावर लक्ष द्याल.
  • कुंभ:-
    कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडी-निवडी बाबत सतर्कता दाखवाल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. आवाजात गोडवा ठेवाल. कौटुंबिक विचार आधी कराल.
  • मीन:-
    तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. तीव्र मतभेद दर्शवू नका. समजूतदारपणाची जाणीव जागृत ठेवावी. दिवस प्रसन्नतेचा जाईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर