13 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १४ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  बैठे खेळ खेळाल. बौद्धिक छंद जोपासाल. वैचारिक मतभेद घडून येतील. मनाचा गोंधळ उडेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव द्यावा.
 • वृषभ:-
  कौटुंबिक विचारात अडकून राहाल. सर्वांशी गोडीने वागाल. गायन कला जोपासता येईल. घरगुती जबाबदारी उचलाल. खाण्या-पिण्याची आवड दर्शवाल.
 • मिथुन:-
  ठामपणा ठेवायला हवा. मनाची चंचलता वाढवू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येवू शकतात. प्रेमसंबंध जपावेत. पित्तविकार त्रासदायक ठरतील.
 • कर्क:-
  सामाजिक जाणिवेतून काही गोष्टी कराव्यात. स्त्रीवर्गापासून दूर राहावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. क्षुल्लक कारणाने काही कामे अडकतील. काचेरीची कामे पुढे ढकलावीत.
 • सिंह:-
  घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षित लाभासाठी पुरेसा वेळ दयावा. कामात स्त्रियांची मदत घ्याल. इच्छित गोष्ट मिळविण्याची जिद्द मनात बाळगाल.जवळचा मित्र भेटेल.
 • कन्या:-
  वडिलांची उत्तम साथ मिळेल. तुमचा मोठेपणा इतरांच्या लक्षात येईल. सामाजिक प्रतिष्ठेकडे लक्ष द्याल. आपली पत जपावी लागेल. कामात सुसंगती ठेवावी.
 • तूळ:-
  तुमची सृजनशीलता दिसून येईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कामावर श्रध्दा ठेवावी. स्वतःचा मान राखण्याचा प्रयत्न कराल. उपासनेचा आधार घ्यावा लागेल.
 • वृश्चिक:-
  मानसिक शांतता महत्वाची आहे. विचारात वाहून जाऊ नका. कमी श्रमात मिळणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊ नये. गुरुजनांवर विश्वास ठेवावा. निराशा मनातून काढून टाकावी.
 • धनु:-
  पत्नीचा लाघवीपणा मनात भरेल. मनातून शंका दूर करावी. भागीदारीकडे विशेष लक्ष द्यावे. मानाजोगी खरेदी करता येईल. दिवस शांततेत जाईल.
 • मकर:-
  हाताखालील लोकांकडे लक्ष द्यावे. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नये. चुकीचे समज होण्याची शक्यता आहे. व्यसनांपासून दूर राहावे. वादाचे प्रसंग आणू नका.
 • कुंभ:-
  मुलांची चिंता लागून राहील. चटकन भावना प्रकट करू नका. काहीसा विसारभोळेपणा जाणवेल. कोणत्याही अनुमानावर येऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.
 • मीन:-
  घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. क्षुल्लक गैरसमज दूर करावेत. घरात नातेवाईक गोळा होतील. मैत्रीत मतवैचित्र दर्शवू नका. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 14 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १२ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ डिसेंबर २०१९
Just Now!
X