• मेष:-
    मानसिक स्थैर्य जपावे. मनाची संवेदनशीलता जपावी. विविध विषयांमध्ये रुची दर्शवाल. जवळचा प्रवास जपून करावा. नसते साहस करू नका.
  • वृषभ:-
    कौटुंबिक गोष्टी सामोऱ्या येतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्या. वैवाहिक सौख्यात भर पडेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल.
  • मिथुन:-
    मानसिक चंचलता जाणवेल. बोलण्यात प्रेमळपणा दाखवाल. इतरांवर छाप पडण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक खेळ खेळाल. तुमच्या कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल.
  • कर्क:-
    मन:शांती जपण्याचा प्रयत्न करावा. कर्जाची प्रकरणे व्यवस्थित हाताळावीत. आध्यात्मिक बळ वाढवावे. आरोग्याची काळजी घ्यावी. नामस्मरणावर भर द्यावा.
  • सिंह:-
    मनातील इच्छा पूर्ण होतील. स्त्री समुहात वावराल. व्यवसायात चांगली कमाई होईल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका.
  • कन्या:-
    घरातील कामात दिवस जाईल. घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल. कामात काही योग्य बदल करावेत. चुकीच्या गोष्टींच्या मागे लागू नका. व्यापारात चांगला फायदा संभवतो.
  • तूळ:-
    धार्मिक कामात मदत कराल. दानशूरता दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. शैक्षणिक कामे पार पडतील. दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावे.
  • वृश्चिक:-
    घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. फार विचार करत बसू नये. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. काही गोष्टी अकस्मात घडतील. प्रवासात काळजी घ्यावी.
  • धनु:-
    जोडीदाराविषयी गैरसमज करू नका. मनातील शंका दूर कराव्यात. उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मनाची चंचलता जाणवेल.
  • मकर:-
    कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळा. एकाच वेळी अनेक कामात व्यस्त राहाल. काही कामे तुमचा कस पाहतील. आध्यात्मिक बळ वाढेल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा.
  • कुंभ:-
    कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. वरिष्ठांना नाराज करू नका. रेस, जुगार यांपासून दूर रहावे. छंदाला योग्य आकार द्यावा. नातेवाईक भेटतील.
  • मीन​:-
    घरातील कामात व्यस्त राहाल. अनेक कमांची धांदल उडेल. मानसिक ताण दूर करावा. गैरसमजाला खतपाणी घालू नका. आरोग्याची काळजी घ्यावी.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 16 november 2019 aau
First published on: 16-11-2019 at 01:00 IST