मेष
शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन
आज शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे.  व्यवसायिक  स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क
ॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे.   महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिकदृष्टिने लाभदायक  स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

सिंह
शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

कन्या
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे.   सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक  दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक  येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक  आवक  चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – जांभळा

तुळ
शनि, मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक
शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – गुलाबी

धनु
शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – हिरवा

मकर
मारूतीची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक  ग्रहमान आहे. कौटुंबिक  सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक  घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – पोपटी

कुंभ
मारूतीला पाच दिवे लावावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक  सावधपणे करावी.
आजचा रंग- जांभळा

मीन
शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu