• मेष:-
    आवक चांगली राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचा अंदाज योग्य असेल. कामाच्या व्यापात गढून जाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
  • वृषभ:-
    सामाजिक कामात अग्रेसर रहाल. मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल. स्व पराक्रमावर अधिक भर द्याल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. धाडसीपणात वाढ होईल.
  • मिथुन:-
    धार्मिक कामात खर्च कराल. पारमार्थिक गोष्टींकडे ओढा वाढेल. गप्पांमध्ये रमाल. फसवणुकीपासून सावधान. मत्सराला बळी पडू नका.
  • कर्क:-
    शारीरिक दगदग वाढू शकते. सट्टे, जुगार यांतून फायदा संभवतो. नाराजीला मनात थारा देवू नये. कामातील अडचणी दूर कराव्यात. निराशा दूर करावी.
  • सिंह:-
    झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनाजोगे काम करता येईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
  • कन्या:-
    नातेवाईकांची मदत मिळेल. चांगली कमाई होईल. लाभाकडे लक्ष द्यावे. वयस्कर मित्र भेटतील. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.
  • तुळ:-
    दलालीच्या कामातून फायदा संभवतो. उपासनेला बळ मिळेल. वायदा पूर्ण करावा. मनातील इच्छा पूर्ण होतील. खटपटीला यश येईल.
  • वृश्चिक:-
    कामाचा दर्जा सुधारेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. संकोच करू नये. कामात जाणीवपूर्वक बदल कराल. इर्षेने कामे हाती घ्याल.
  • धनु:-
    लिखाणातून फायदा संभवतो. एजन्सीच्या कामात यश येईल. काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. स्वबळावर विश्वास ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी.
  • मकर:-
    पत्नीकडून धनलाभ संभवतो. भागीदारीतून पैसा मिळेल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल.
  • कुंभ:-
    गैरसमजाला मनात थारा देवू नये. भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद टिकवून ठेवावा. राग आवरता घ्यावा.
  • मीन:-
    मानसिक स्थैर्य जपावे. विचारांच्या गर्दीत वाहून जावू नये. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. किरकोळ दुखापतींपासून सावध राहावे. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर