28 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १८ जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-
  व्यावसायिक चिंता मिटेल. हातात विशेष अधिकार येतील. वडीलांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. घरातून उत्तम सहकार्य लाभेल.
 2. वृषभ:-
  शांततेने विचार कराल. दान-धर्माचे महत्व समजावून द्याल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. काही कामांत क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल.
 3. मिथुन:-
  सांपत्तिक स्थैर्य लाभेल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ होईल. तुमची कमाई वाढेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
 4. कर्क:-
  उत्तम वाहन सौख्य लाभेल. नातेवाईकांचा सहवास मिळेल. मानसिक शांतता राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीत सलोखा वाढेल.
 5. सिंह:-
  नातेवाईकांची मदत होईल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. भावनांना मुरड घालावी. मुलांच्या स्वछंदीपणाकडे लक्ष ठेवा.
 6. कन्या:-
  चांगला आर्थिक लाभ होईल. काटकसरीने वागाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. कर्ज-प्रकरणे तूर्तास टाळावीत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.
 7. तूळ:-
  धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कर्तृत्वाने मान मिळवाल. उपासनेला बळ मिळेल. गुरुकृपेचा लाभ होईल. सरकारी कामात वेळ जाईल.
 8. वृश्चिक:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाने भारावून जाल. इतरांचे कौतुक करण्याचे विसरू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. चंचलतेवर मात. करावी.
 9. धनू:-
  विलंबावर मात करा. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. शैक्षणिक गरज भागेल. बक्षि‍सास पात्र व्हाल. अचानक धनलाभ संभवतो.
 10. मकर:-
  वाचनाची आवड पूर्ण होईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. आशावादी दृष्टीकोन ठेवाल. तात्विक वादात अडकू नका. हातातील अधिकार योग्य प्रकारे वापरा.
 11. कुंभ:-
  आशावादी दृष्टीकोन ठेवाल. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. व्यवसायात प्रगती करता येईल. स्वत:चा मान राखाल. तर्कनिष्ठ बुद्धी वापराल.
 12. मीन:-
  आध्यात्मिक क्षेत्रांतील व्यक्तींची गाठ पडेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ घेता येईल. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. आर्थिक गरज पूर्ण होईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 18 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १६ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, १५ जानेवारी २०२०
Just Now!
X