मेष

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितासाठी चांगला दिवस आहे. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. शनी मारुती मंदिरात तीळ तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग- तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम शनैश्वराय नमः
आजचे रंग – निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. शनी मारुती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करावे.
आजचा रंग- राखाडी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. पुरुष सुक्तांचे पाठ करावेत.
आजचा रंग – नारंगी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. शनीला तेल अर्पण करावे.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ओमकार मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. शनी मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस उत्तम आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. दत्त महाराजांच्या आणि शनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. गुरुचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे. लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu