• मेष:-
    आवडते पदार्थ चाखाल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आरोग्यात सुधारणा होईल. कामापेक्षा इतर गोष्टींमध्ये अधिक वेळ जाईल. गृह-उपयोगी वस्तू खरेदी कराल.
  • वृषभ:-
    चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. केलेली गुंतवणूक उपयोगात येईल. गोड बोलून कामे साधाल. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल.
  • मिथुन:-
    महत्वाच्या गोष्टींपेक्षा इतर गोष्टींवर अधिक खर्च होईल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. प्रवासात चोरांपासून सावध राहावे. धार्मिक ठिकाणी देणगी द्याल. कोर्ट-कचेरीच्या कामात वेळ जाईल.
  • कर्क:-
    सांपत्तिक दर्जा सुधारेल. नवीन मित्र जोडाल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. नवीन आकांक्षांना बळ मिळेल. व्यापाऱ्यांना समाधानकारक लाभ होईल.
  • सिंह:-
    नसत्या काळज्या करू नका. कामात धर-सोड पण आणू नये. आवाक्या बाहेरील खर्च टाळावा. कामात उत्साह जाणवेल. दिवस दगदगीत जाईल.
  • कन्या:-
    सामाजिक वादात अडकू नका. जुनी प्रकरणे हाताळावी लागतील. लोकनिंदेकडे लक्ष देऊ नये. आर्थिक हानी भरून काढावी. स्नायू धरण्याचा त्रास जाणवू शकतो.
  • तूळ:-
    मित्र-मंडळींशी जुळवून घ्यावे. क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालू नका. वरिष्ठांची मर्जी राखावी. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
  • वृश्चिक:-
    आपली प्रतिष्ठा जपावी. विरोधकांचा त्रास वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. अनपेक्षित अडचणी दूर कराल. काहीतरी नवीन करण्याकडे भर द्याल.
  • धनु:-
    प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाच्या गोष्टी नजरेआड कराव्यात. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
  • मकर:-
    करमणुकीचा आनंद घ्याल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. आवडीचे पुस्तक वाचाल. हस्तकलेत रमून जाल. दिवस मजेत घालवाल.
  • कुंभ:-
    घरातील टापटिपपणाकडे अधिक लक्ष द्याल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागाल. मतभिन्नता दर्शवू नका. जवळचा प्रवास सुखाचा होईल.
  • मीन:-
    मैत्रीतील गोडवा वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. कामे यथायोग्य पार पडतील. लहरीपणे वागू नये. मित्रांमध्ये कौतुकास पात्र व्हाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर