News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २२ ऑगस्ट २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

वृषभ:-निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

मिथुन:-टीका कारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:-निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

सिंह:-मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

कन्या:-दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

तूळ:-ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील.

वृश्चिक:-व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

धनू:-जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे.

मकर:-मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका.

मीन:-आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 22nd august 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २० ऑगस्ट २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, १९ ऑगस्ट २०२०
Just Now!
X