• मेष:-
    हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
  • वृषभ:-
    मुलांबरोबर मजेत दिवस घालवाल. साहित्याची आवड दर्शवाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित कराल.
  • मिथुन:-
    दिवसभर कामात अडकून पडाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. जवळचे मित्र भेटतील. बागकामात लक्ष घालाल. स्थावरची कामे निघतील.
  • कर्क:-
    भावनेला आवर घालावी लागेल. आवडते साहित्य वाचाल. कामात द्विधावस्था जाणवेल. घाईघाईने विचार मांडू नका. किरकोळ खरेदी कराल.
  • सिंह:-
    गोड पदार्थ चाखायला मिळतील. योग्य वेळी हातातील अधिकार वापरावेत. भावंडाना मदत कराल. हातातील कामात चांगले यश मिळेल. तुमचा दर्जा सुधारेल.
  • कन्या:-
    मानसिक व्यग्रता टाळावी. कामाचा बोजा वाढवू नये. वादविवादात लक्ष घालू नका. समयसूचकता वापरावी लागेल. नसते धाडस करू नका.
  • तूळ:-
    तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चुकीच्या लोकांच्या सहवासात अडकू नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. क्षुल्लक गोष्टींनी निराश होऊ नका.
  • वृश्चिक:-
    सामाजिक वादात लक्ष घालू नये. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. केवळ स्वतःचेच खरे करत बसू नका. कामाचे योग्य नियोजन करावे.
  • धनु:-
    ध्यानधारणा करावी. कामात चंचलता आणू नये. लहान मुलांच्यात रमाल. मैत्रीत सलोखा वाढवावा. नवीन विचारांची जोड घ्यावी.
  • मकर:-
    तुमच्या अधिकारात वाढ होईल. काही नवीन कामे अंगावर येतील. मानसन्मानास पात्र व्हाल. एखादे प्रशस्तीपत्र मिळवाल. इतरांना मदत करण्यात आनंद मनाल.
  • कुंभ:-
    पोटाची किरकोळ तक्रार राहील. मोठ्या व्यक्तींची घरात उठबस राहील. सर्वांचे आपुलकीने कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. पत्नीची प्राप्ती वाढेल.
  • मीन:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. अति अपेक्षा ठेवू नका. व्यावसायिक गोष्टीत दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसंग उदभवू शकतात.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर