25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. घरातील वातावरण आनंदी असेल. घर खर्चाचा पुनर्विचार कराल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.
 • वृषभ:-
  स्वत:च्या जबाबदारीवर कामे हाती घ्याल. पराक्रमाला वाव आहे. नवीन उलाढाली कराल. सर्व गोष्टींची अनुकुलता लाभेल. दिवस मनासारखा जाईल.
 • मिथुन:-
  दानधर्म कराल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. सार्वजनिक कामात मदत कराल. खर्चाचे नवीन गणित मांडावे. आर्थिक आवक चांगली राहील.
 • कर्क:-
  मित्रमंडळींच्या सहवासात दिवस घालवाल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. तुमची इच्छा पूर्ण होईल. स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे पार पडतील. जवळचे मित्र भेटतील.
 • सिंह:-
  धरसोडपणा करून चालणार नाही. सारासार विचार करून निर्णय घ्यावेत. काळजी करण्याचे कारण नाही. कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. व्यावसायिक लाभ अपेक्षेनुसार राहील.
 • कन्या:-
  उत्कृष्ट आर्थिक फायदा संभवतो. आर्थिक कोंडी मिटेल. अडचणीवर मात करता येईल. गुरुकृपेचा लाभ होईल. मदत केल्याचे समाधान लाभेल.
 • तुळ:-
  काही कामे वेळ काढतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. वडिलांची नाराजी दूर करावी. मैत्रीतील गैरसमज दूर करावेत. अचानक धनलाभाची शक्यता.
 • वृश्चिक:-
  पत्नीच्या सुशीलपणाचे कौतुक कराल. भागादाराची उत्तम साथ मिळेल. एकमेकांबद्दलची प्रेमळ ओढ वाढेल. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो.
 • धनु:-
  आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. हाताखालील मंडळींची चांगली साथ लाभेल. आत्मविश्वास बाळगावा.
 • मकर:-
  प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. नाटक, सिनेमा पाहण्याचे कार्यक्रम आखाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. कामात चलाखी दाखवाल. बुद्धीकौशल्याने कामे कराल.
 • कुंभ:-
  घरातील वातावरणात रमून जाल. मानसिक सौख्य लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. वादाचे प्रसंग उकरून काढू नका. इतरांचा विश्वास संपादन करावा.
 • मीन:-
  ज्ञानात भर पडेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्याल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडातील प्रेमळपणा वाढेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on August 24, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 24 august 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २३ ऑगस्ट २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २२ ऑगस्ट २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २१ ऑगस्ट २०१९
Just Now!
X