मेष
हनुमान चालिसाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकामध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ
हनुमान चालिसा पाठ करणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
मारूती दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कर्क
मारूतीला शेंदूर अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पोपटी

सिंह
मारूती दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – जांभळा

कन्या
कालभैरव दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठा निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ
शनि मारूती मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
शनि मारूती मंदिरात तेल व शेंदूर अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी लागेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – नारंगी

धनु
ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम देवभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
मारूती मंदिरात स्त्रोत म्हणून दिवसाची सुरूवात करणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग- निळा

मीन
मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu