22 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २५ जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    जलद गतीने कामे कराल. सतत आपले अस्तित्व दाखवाल. सरकारी कामात यश येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची समाजप्रियता वाढेल.
  2. वृषभ:-
    तुमचे अंगीभूत गुण दिसून येतील. चांगल्या बोलण्याने व्यावसायिक मान मिळवाल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीच्या वस्तू गोळा कराल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.
  3. मिथुन:-
    मनाची विशालता दाखवाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. सहृदयतेने वागाल. अचानक धनलाभ संभवतो.
  4. कर्क:-
    जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मुलांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे. खर्चाच्या बाबतीत अविचाराने निर्णय घेऊ नका. रेस, सट्टा यांची आवड पूर्ण कराल. कामातील विलंब टाळावा.
  5. सिंह:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. घरातील शांतता महत्त्वाची आहे. स्थावरची कामे पूर्णत्त्वाला जातील. कामाचे समाधान लाभेल. भावंडांची काळजी लागून राहील.
  6. कन्या:-कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. नातेवाईकांची मदत घेता येईल. भावनेतून मनाचे शुद्ध रूप दर्शवावे. खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घ्याव्यात.
  7. तूळ:-
    सर्जनशीलतेने वागाल. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मित्रपरिवार जमवाल. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ घालवाल.
  8. वृश्चिक:-
    घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. आपल्या प्रांजल स्वभावाची चुणूक दाखवाल. बागकामाची हौस भागवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. घरात समाधान निर्माण कराल.
  9. धनू:-
    आनंदीवृत्तीने वागाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांचे भरभरून कौतूक कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. यशाची वाट मोकळी होईल.
  10. मकर:-
    बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडाल. क्षुल्लक कमतरता भरून निघेल. गायन कलेला उठाव मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आवडते खाद्य पदार्थ खाल.
  11. कुंभ:-
    तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. सर्वांशी मधूर वाणीने बोलाल. नवीन गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घ्याल. उत्तम मैत्री लाभेल.
  12. मीन:-
    यशाची नवीन पायरी गाठता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे करावीत. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on January 25, 2020 5:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 25 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २४ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ जानेवारी २०२०