मेष

शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. अधिकारी व्यक्तींसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यात्मिकता वाढेल.
आजचा रंग – जांभळा

वृषभ

मारूतीला पाच दिवे लावावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

मारूतीची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क

शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होईल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –निळा

सिंह

शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. वातविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -जांभळा

कन्या

शनि, मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होईल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग – नारंगी

तुळ

शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गृह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस. प्रगतीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदी जाईल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवते.
आजचा रंग –पांढरा

धनु

ॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – आकाशी

मकर

आज शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगाई नको.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. मोठे आर्थिक नियोजन करीत असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- पांढरा

मीन

शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu