News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑगस्ट २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
गणपतीचे आणि मारूतीचे दर्शन घेऊन लाल फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबीक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
गुरूचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन
दत्त महाराजांच्या आणि शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कर्क
शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – निळा

सिंह
ओम कार मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडाशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – मोरपंखी

कन्या
शनिला तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – जांभळा

तुळ
पुरूष सुक्तांचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

वृश्चिक
शनि मारूती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – गुलाबी

धनु
ओम शनैश्वराय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – हिरवा

मकर
शनि मारूती मंदिरात तीळ तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – पोपटी

कुंभ
मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग- जांभळा

मीन
गणपती व मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आह. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 26 august 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑगस्ट २०१७
2 आजचे राशीभविष्य, गुरूवार, २४ ऑगस्ट २०१७
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २३ ऑगस्ट २०१७
Just Now!
X