22 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ:-अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

मिथुन:-आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क:-अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह:-आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या:-आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ:-हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक:-जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू:-कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर:-हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ:-कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन:-सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:16 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 26 september 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २४ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २३ सप्टेंबर २०२०
Just Now!
X