मेष

शनि मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –जांभळा

वृषभ

मारुतीला पाच दिवे लावावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होईल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

मारुतीची उपासना करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामाता दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

कर्क

शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –निळा

सिंह

शनि मंत्राचा जप करावा. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -जांभळा

कन्या

शनि, मारुतीचे दर्शन घ्यावे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबवता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –नारंगी

तुळ

शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

शनि मंत्राचा पाठ करावा. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पांढरा

धनु

ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –आकाशी

मकर

आज शनि मंत्राचा पाठ करावा. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसयिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करावे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu