27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  स्वच्छंदीपणे वागाल. आपल्याच पद्धतीने दिवस घालवाल. शैक्षणिक कामे वेळेत पार पडतील. आरोग्यात सुधारणा होईल. कामाची पद्धत वाखाणली जाईल.
 • वृषभ:-
  घरातील कामात दिवस जाईल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा. उत्तम गृहसौख्य मिळेल. नवीन मित्र भेटतील.
 • मिथुन:-
  कामाचा ताण काहीसा कमी होईल. जवळचा प्रवास चांगला होईल. वाहन खरेदीचा विचार केला जाईल. महिलांवर कामाचा ताण येईल. नवीन शत्रू निर्माण होतील.
 • कर्क:-
  मंगलकार्यात भाग घ्याल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. भावंडांची काळजी घ्यावी. हातातील कलेला यश येईल.
 • सिंह:-
  दिवस मजेत घालवाल. जबाबदारीने कामे पार पडतील. भावंडांकडून त्रास संभवतो. मित्रमंडळींशी वाद घालू नका. सरकारी कामात अडकून पडाल.
 • कन्या:-
  डोके शांत ठेवावे. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. कामामुळे थकवा जाणवेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. मित्रांची नाराजी दूर करावी लागेल.
 • तूळ:-
  काही कामात अपेक्षित यश मिळताना अडचण येवू शकते. कोणताही विषय फार वाढणार नाही याची काळजी घ्यावी. चोरांपासून सावधान राहा. नसत्या वादात पडू नका. चित्त शांत ठेवावे.
 • वृश्चिक:-
  अधिकारी व्यक्तींशी मैत्री होईल. कामाला स्त्रीवर्गाचे सहकार्य लाभेल. जवळच्या मित्रांशी वाद घालू नका. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
 • धनु:-
  मानसिक शांतता लाभेल. कामावरच लक्ष केंद्रित करावे. आर्थिक स्थैर्याचा विचार कराल. नसत्या भानगडीत पडू नका. अनपेक्षित अडचण दूर करावी.
 • मकर:-
  सरकारी कामात दिवस जाईल. बदलला सामोरे जावे. कमिशनमध्ये फायदा होईल. कलेचा प्रसार करता येईल. वडिलधाऱ्यांची मर्जी संपादन कराल.
 • कुंभ:-
  जमिनीच्या कामात फायदा होईल. अचानक धनलाभाची शक्यता. हातातील कामे वेळेत पूर्ण होतील. चुकीचा विचार करू नका. वैवाहिक सौख्य जपावे.
 • मीन:-
  भांडणातून त्रास संभवतो. सामोपचाराचे धोरण ठेवावे. वैवाहिक सौख्याचा आनंद घ्याल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीतील फायद्याकडे लक्ष द्यावे.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 28 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ सप्टेंबर २०१९
Just Now!
X