मेष ॐ परिष्ठाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचे दिवस आहेत. आजचा रंग –राखाडी वृषभ ॐ वृषयै नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी. आजचा रंग –पांढरा मिथुन ॐ स्वसंवेदनाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी. आजचा रंग – तपकिरी कर्क ॐ रामचंद्राय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. आजचा रंग –निळा सिंह ॐ निरभेश्वराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. आजचा रंग -राखाडी कन्या ॐ शिवसुताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. आजचा रंग –नारंगी तुळ ॐ गवाध्यक्षाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. आजचा रंग -राखाडी वृश्चिक ॐ प्राणदेवताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारामंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात. आजचा रंग –पांढरा धनु ॐ महेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. आजचा रंग – आकाशी मकर ॐ जगदिश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल. आजचा रंग – मोरपंखी कुंभ ॐ पुर्णानंदाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल. आजचा रंग- पोपटी मीन ॐ सर्वेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.आजचा रंग – राखाडी डॉ. योगेश मुळे Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu