• मेष:-
    बौद्धिक दृष्टीकोनातुन विचार कराल. इतरांना मदत करण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद ठरेल. उपासनेला अधिक बळ मिळेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. हातातील कामात यश येईल.
  • वृषभ:-
    कंजूसपणा दाखवू नये. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. मतभेदाला मनात थारा देऊ नये. काही इच्छा पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
  • मिथुन:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. आध्यात्मिक दृष्टीने दिवस चांगला जाईल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक अपेक्षा पूर्ण होईल.
  • कर्क:-
    सांपत्तिक दर्जा सुधारेल. अपचनाचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याची हयगय करू नये. नातेवाईकांची मदत मिळेल. जुने मित्र भेटतील.
  • सिंह:-
    मुलांशी सुसंवाद साधाल. बौद्धिक छंद जोपासता येईल. योग्य तर्क वापराल. बक्षिसास पात्र व्हाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल.
  • कन्या:-
    नवीन वाहन खरेदीसाठी प्रयत्न करा. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
  • तूळ:-
    सर्वांशी प्रेमळपणे वागाल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. कामात अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. हातून चांगले लिखाण होईल. गायन कलेत प्रगती करता येईल.
  • वृश्चिक:-
    जुनी कामे सामोरी येतील. आर्थिक प्रश्न सुटतील. वारसाहक्काची कामे निघतील. व्यापरिवर्गाला चांगला धनलाभ होईल. कामातून अपेक्षित धनलाभ होईल.
  • धनु:-
    तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. कामाची योग्य पद्धत निवडाल. सर्वांशी खिलाडूवृत्तीने वागाल. स्वतःचा मान राखाल. हातात नवीन अधिकार येतील.
  • मकर:-
    पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. काही गोष्टींपासून दूर रहाल. सामाजिक सेवेत असणाऱ्यांना प्रगती करता येईल. क्षमशीलतेने वागाल.
  • कुंभ:-
    सुसंस्कृत मित्रांच्यात वावराल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल.
  • मीन:-
    व्यावसायिक चिंता दूर होईल. तुमचा मानसन्मान वाढीस लागेल. कामात वडिलांचे सहकार्य घेता येईल. पोटाचा त्रास उदभवू शकतो. गैरसमज मनात धरून ठेवू नयेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर