मेष : परिचयातून कामे पूर्ण होतील. मातृसौख्य लाभेल. आपल्या तडफदार बोलण्याचा प्रभाव पडेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.

वृषभ : वास्तुविषयक प्रश्नासंबंधी चर्चा होईल. शैक्षणिक पारितोषिके मिळतील. उधारी वसूल होईल. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

मिथुन : आपली मते कुटुंबातील व्यक्तींना पटवून द्याल. शैक्षणिक संदर्भात अपेक्षित गाठीभेटी होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीमुळेआर्थिक प्राप्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता वाटेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

कर्क : आपले मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विशिष्ट लाभ होतील नोकरीत भाग्यवृद्धी करणारी घटना घडेल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. संतांचा सहवास लाभेल.

सिंह : मानसिक अस्वास्थ जाणवेल. मित्र परिवारापैकी एखाद्यास आर्थिक सहाय्य करावे लागेल. नोकरीत महत्वाच्या कामाचीजबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्यांना चांगले लाभ होतील.

कन्या : आजचा दिवस आपली इच्छापूर्ती होण्यास अनुकूल आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. वडिलभावंडाचे सहकार्य लाभेल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल.

तूळ : वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. नोकरी व्यवसायात भाग्यवृद्धी करणार्या घटना घडतील. गुंतवणूकीसंबंधी चर्चा करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल करावा सुखावह वाटेल.धार्मिक स्थळांना भेटी द्याल.

वृश्चिक : संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपले निर्णय योग्य ठरतील. प्रवासयोगाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय घेणे गरजेचे आहे.

धनू : वाहन चालवताना सावधानता बाळगा. जोडीदाराच्या व्यवसायात भाग्यवृद्धी घडेल. आर्थिक सहकार्य मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने तोंड द्याल. नव्या उमेदीने कामाला लागाल.

मकर : व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढविताना सावधगिरी बाळगावी. पत्नीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. चांगली बातमी समजेल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील.

कुंभ : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. अचानक धनलाभाची शक्यत आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल.

मीन : आपल्या हातून आध्यात्मिक, लहानमुलांसंबंधी गोष्टींचे लिखाण होण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. तीर्थक्षेत्रासभेट देण्यासाठी प्रवास घडेल. आपल्या नोकरीत आज भाग्यकारक घटना घडेल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर