05 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, ७ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल.
  • वृषभ:-व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.
  • मिथुन:-चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.
  • कर्क:-दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.
  • सिंह:-छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.
  • कन्या:-जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.
  • तूळ:-नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात.
  • वृश्चिक:-तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हितशत्रूंवर मात करता येईल.
  • धनू:-आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल.
  • मकर:-शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.
  • कुंभ:-कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल.
  • मीन:-कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

       – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 7th march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ६ मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ५ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ४ मार्च २०२०
Just Now!
X