05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, ०३ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी आदराने वागाल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल. मनात नवीन महत्वकांक्षा जागृत होईल.
 • वृषभ:-
  दिवस आनंदात जाईल. तुमचा नावलौकिक होईल. कामाचे समाधान लाभेल. परमार्थाचे महत्व जाणाल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
 • मिथुन:-
  मानसिक चंचलता जाणवेल. काही ठिकाणी ठामपणा दाखवावा लागेल. अनेक कामातून गोंधळ उडवून घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मधून धनलाभ संभवतो.
 • कर्क:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा प्रेमळपणा पुन्हा एकदा दिसून येईल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास मजेत पार पडेल. सर्वांशी समजूतदारपणे वागाल.
 • सिंह:-
  तिखट पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. काही निर्णय धाडसाने घ्याल. प्रकृतीची चिंता दूर होईल. खर्च आटोक्यात ठेवावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल.
 • कन्या:-
  उष्णतेचा त्रास जाणवेल. अडचणींवर मात करावी. गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. डोळ्यांची काळजी घ्यावी.
 • तूळ:-
  कामाचा व्याप वाढू शकतो. काही गोष्टींमध्ये अडकून पडल्या सारखे वाटू शकते. मानापमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका.
 • वृश्चिक:-
  झोपेची तक्रार जाणवेल. चांगला धनलाभ संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. हातातील कामात यश येईल. चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल.
 • धनु:-
  अनाठायी खर्च वाढू शकतो. मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याचा मान ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. आर्थिक व्यवहारात सावध राहावे.
 • मकर:-
  दिवस मनासारखा व्यतीत कराल. जवळचे मित्र भेटतील. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. व्यावसायिक लाभ चांगला होईल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील.
 • कुंभ:-
  अपचनाचा त्रास जाणवू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल.
 • मीन:-
  पत्नीशी मतभेद संभवतात. भागीदारीत सलोखा जपावा. चुकीच्या संगतीत अडकू नका. वरिष्ठांची मर्जी राखावी. मनातील अकारण भीती काढून टाकावी.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 03 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०२ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X