News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  ठरवल्याप्रमाणे दिवस व्यतीत कराल. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. मानसिक स्थैर्य जपावे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
 • वृषभ:-
  मानसिक चांचल्य जाणवेल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. उगाचच काळजी लागून राहील. भावंडांना दूर गावी जावे लागेल. उधारी चुकती करावी लागेल.
 • मिथुन:-
  स्वकष्टावर अधिक भर द्यावा. सांपत्तिक स्थिती सुधारेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल.
 • कर्क:-
  कामात उर्जितावस्था लाभेल. कामातून मानास पात्र व्हाल. तुमची कार्यशीलता वाढेल. सामाजिक दर्जा सुधारायला मदत होईल. स्वतः च्या कामावर विश्वास ठेवाल.
 • सिंह:-
  ऐहिक गोष्टींकडे लक्ष राहील. काही गोष्टींपासून दूर राहवेसे वाटेल. यात्रेचे योग येतील. परोपकारी वृत्ती ठेवून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.
 • कन्या:-
  अचानक धनलाभ संभवतो. प्राईझ बॉण्ड्स, रेस यातून धनलाभ संभवतो. मनाची चलबिचलता जाणवेल. कामात एकसूत्रता ठेवावी. शब्द जपून वापरावेत.
 • तूळ:-
  प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविता येईल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. स्वभावातील हेकटपणा दूर करावा. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
 • वृश्चिक:-
  इतरांच्या सल्ल्याने वागू नका. नातेवाईकांची मदत मिळेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
 • धनु:-
  मुलांची चिंता लागून राहील. प्रेमात गैरसमज आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. कल्पकता वापरण्याची संधी मिळेल. नवीन विचारांना चालना द्यावी.
 • मकर:-
  उत्तम वैवाहिक सौख्य मिळेल. सासुरवाडीची चांगली साथ मिळेल. जोडीदाराचा प्रेमळपणा लक्षात येईल. चांगले गृहसौख्य राहील. आप्त-स्वकीय भेटतील.
 • कुंभ:-
  मनाची अस्थिरता दूर सारावी. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळावेत. इतरांचा मत्सर करू नका. बौद्धीक ताण जाणवू शकतो. प्रवासात काळजी घ्यावी.
 • मीन:-
  घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आर्थिक उन्नती साधता येईल. मुलांच्या आनंदाने भारावून जाल. कलेतून आर्थिक लाभ होईल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 08 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ डिसेंबर २०१९
Just Now!
X