25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ सप्टेबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  सेवेचे महत्त्व जाणाल. धार्मिक गोष्टीची आवड जोपासाल. शैक्षणिक कामाला गती येईल. विरोधकांचा त्रास जाणवेल. हातातील कामे रेंगाळू शकतात.
 • वृषभ:-
  जुगारात अपयश येवू शकते, सावध राहावे. लोकोपवादापासून दूर राहावे. नातेवाईकांचा ससेमिरा मागे लागू शकतो. नसत्या चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. चुकीची संगत लागू शकते.
 • मिथुन:-
  जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकारांचा त्रास जाणवू शकतो. कामानिमित्त दूरचा प्रवास घडेल. मुलांच्या दुखण्याकडे लक्ष द्यावे. कलेतून चांगले मानधन मिळेल.
 • कर्क:-
  उधळपट्टी टाळावी. गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करावा. मागचापुढचा विचार करून मगच निर्णय घ्यावा. नसत्या वादात अडकू नये. वडिलधाऱ्यांच्या रागाला बळी पडाल.
 • सिंह:-
  उष्णतेचे विकार जाणवतील. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. काही कामांमध्ये अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमाचा थकवा जाणवेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
 • कन्या:-
  आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. तुमच्यावर आळ येण्याची शक्यता आहे. पायाचे त्रास जाणवू शकतात. स्त्रीवर्गाच्या बाबतीत सावध भूमिका घ्यावी. फार चिंता करू नये.
 • तूळ:-
  कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. अपेक्षित लाभाने आपण खुश असाल. वाहन विषयक कामे पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात यश येईल. वरिष्ठ तुमच्यावर खुष असतील.
 • वृश्चिक:-
  व्यावसाईक चिंता सतावेल. कलेतून आर्थिक फायदा संभवतो. सरकारी कामात अडकून पडाल. जोडीदाराची कमाई वाढेल. चुकीच्या कामात हात घालू नये.
 • धनु:-
  तुमचे स्थान सिध्द कराल. शांतपणे विचार कराल. कामातील क्षुल्लक चुका दूर कराव्यात. घरात काही बदल करावे लागतील. खर्चाचा प्रश्न सोडवाल.
 • मकर:-
  मानसिक व्यग्रता जाणवेल. एकच विचार फार काळ मनात ठेवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कामात मन गुंतवावे. हातातील कामे वेळेत पूर्ण होतील.
 • कुंभ:-
  व्यावसायिक लाभ समाधानकारक असेल. वरिष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल. आरोग्याबाबत सतर्क राहावे. तुमच्या कामाची योग्य दखल घेतील जाईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
 • मीन:-
  उद्योग-धंद्यात बारीक लक्ष घालावे. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. काही व्यावसायिक बदल संभवतात. चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकू नका. पैसा जपून वापरावा लागेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 8, 2019 8:21 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 08 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ सप्टेंबर २०१९
Just Now!
X