मेष ः ॐ परमपुरुषाय नमः आजचा शुभ रंग लाल आहे. संतती सौख्य लाभेल. कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल. वृषभ ः ॐ परमात्मने नमः आजचा शुभ रंग पांढरा आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. बांधकाम व्यवसायीक, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. मिथुन ः ॐ श्रीवर्धनाय नमः आजचा शुभ रंग आकाशी आहे. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कर्क ः ॐ भानवे नमः आजचा शुभ रंग लाल आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जुनी येणी वसूल करु शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत. व्यवसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे. सिंह ः ॐ व्यंकटाधिपतये नमः आजचा शुभ रंग गुलाबी आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. व्यवसायीक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वाकांक्षी योजनांची आखणी करावी. कन्या ः ॐ अंजने नमः आजचा शुभ रंग राखाडी आहे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. कौटुंबीक सौख्य लाभेल. बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. तुळ ः ॐ सुरेश्वराय नमः आजचा शुभ रंग राखाडी आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. वृश्चिक ः ॐ परमेशाय नमः आजचा शुभ रंग हिरवा आहे. अधिकारी वर्गांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. मोठे व्यवसायिक धाडस करु शकाल. धनु ः ॐ परिपूर्णाय नमः आजचा शुभ रंग पांढरा आहे. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यवसायीकांना, नोकरदार मंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. मकर ः ॐ मयुरेशाय नमः आजचा शुभ रंग हिरवा आहे. व्यवसायीक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठी आर्थिक उलाढाल करु नये. कुंभ ः ॐ जनार्दनाय नमः आजचा शुभ रंग नारंगी आहे. व्यवसायीक स्थिरता लाभेल. नोकरदार मंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात. मीन ः ॐ सदानंदाय नमः आजचा शुभ रंग केशरी आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. – डॉ. योगेश मुळे Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu