• मेष:-
    काही गोष्टींपासून दूर राहवेसे वाटेल. जमीनकीच्या व्यवहारातून फायदा संभवतो. चंचलतेल दूर सारावे लागेल. चोरांपासून सावध राहावे. घरगुती कामात दिरंगाई संभवते.
  • वृषभ:-
    कामात स्त्री वर्गाची मदत घेतली जाईल. नवीन कपडे खरेदी कराल. कामातील द्विधा मनःस्थिती बाजूला सारावी. काहीतरी वेगळे करण्यावर भर द्याल. मित्रांमध्ये प्रशंसेस पात्र व्हाल.
  • मिथुन:-
    एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. घराकडे अधिक लक्ष द्याल. जमिनीच्या प्रकरणातून फायदा संभवतो. कामाच्या ठिकाणी मान मिळवाल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील.
  • कर्क:-
    धार्मिक स्थळांना भेट द्याल. गुरूजनांचा आशिर्वाद मिळेल. तुमच्यातील श्रध्दा वाढीस लागेल. दृष्टीकोन बदलून पहावा. स्वतः चा मान राखून काम कराल.
  • सिंह-
    दोन पावले मागे येण्यास कचरू नका. ध्यानधारणा करावी. इतरांच्या वागण्याचा फार विचार करु नये. अचानक धनलाभाची शक्यता. इतरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नका.
  • कन्या:-
    एकमेकांमधील गैरसमज दूर करावेत. प्रेमळपणे बाजू समजून घ्यावी. भागीदारीत समाधानी असाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मत स्पष्टपणे मांडावे.
  • तूळ:-
    मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. प्रेम प्रकरणात जिव्हाळा वाढेल. संसर्गजन्य विकार बळावू शकतात. कलहापासून दूर रहावे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.
  • वृश्र्चिक:-
    मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. नाटक बघण्याचा कार्यक्रम आखाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. भावनिक विचार मांडाल. खेळातून कमाई होईल.
  • धनू:-
    सर्व गोष्टीत आपुलकीने रस घ्याल. बागकामाची आवड जोपासाल. प्रवास मजेत होईल. चांगली मन:शांती लाभेल. कामाचे समाधान मिळेल.
  • मकर:-
    लहरीपणे वागणे टाळावे. तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल. एकलकोंडेपणा बाजूला सारावा. जून्या गोष्टी उगाळत बसू नये. उत्तम साहित्य वाचाल.
  • कुंभ:-
    आपले मत स्पष्टपणे मांडावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आवडी-निवडी बाबत जागरूक रहाल. गुंतवणूकीचा नवीन पर्याय शोधावा. सर्वांना मधूर वाणीने जिंकून घ्याल.
  • मीन:-
    जोडीदाराचा वरचष्मा राहिल. भागीदाराशी मतभेद वाढवू नयेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार करावा. कौटुंबिक गोष्टीत सर्वप्रथम लक्ष घालावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर