• मेष:-
    कौटुंबिक वातावरणात रमून जाल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. जमिनीची कामे निघतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. विचारांना आधुनिकतेची जोड द्याल.
  • वृषभ:-
    सर्वांचे आनंदाने कराल. प्रवासाचा आनंद मिळेल. स्वभावात काहीसा लहरिपणा जाणवेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.
  • मिथुन:-
    सर्वांशी गोडीने वागाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक विचार सर्वप्रथम कराल. काही घरगुती जबाबदारी उचलाल. उत्तम गुंतवणूक करता येईल.
  • कर्क:-
    दिवस मानाजोगा व्यतीत कराल. तुमच्या प्रेमळपणाची सर्वांवर छाप पडेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होईल.
  • सिंह:-
    काही गोष्टींची गुप्तता पाळाल. एखादी चांगली संधी चालून येईल. दूरवर फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. चोरांपासून सावध राहावे. मन:शांती जपण्याचा प्रयत्न कराल.
  • कन्या:-
    कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. नवीन अलंकार खरेदी कराल. स्त्रियांच्या मदतीने कामे सुकर होतील. कलेची आवड पूर्ण करता येईल. मित्रांच्या संगतीत दिवस मजेत जाईल.
  • तूळ:-
    कामाची धांदल उडेल. उत्साहाने नवीन कामे हाती घ्याल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपलेच मत खरे कराल. कामाचे स्वरूप ठरवावे.
  • वृश्चिक:-
    वादाच्या प्रसंगांपासून दूर राहावे. उपासनेला आधील बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रभुत्व राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. नि:स्वार्थीपणे इतरांना मदत कराल.
  • धनु:-
    आशावादी दृष्टिकोन ठेवाल. न्यायाची कास धराल. हाती नवीन अधिकार येतील. खिळाडूवृत्तीने वागाल. स्वतःचा मान राखाल.
  • मकर:-
    काही बाबींपासून दूर राहवेसे वाटेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न कराल. आर्थिक अडचण समजून घ्यावी. क्षमाशीलता दाखवाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.
  • कुंभ:-
    काटकसरीने वागाल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. आर्थिक आकांक्षा पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ होईल.
  • मीन:-
    कामात तुमचा बौद्धिक कस लागेल. व्यावसायिक चिंता मिटेल. हातात विशेष अधिकार येतील. नावलौकीकस पात्र व्हाल. घरातून चांगली मदत मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर