• मेष:-
    मानसिक चंचलता जाणवेल. आध्यात्मिक ओढ वाटेल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला घ्याल. एककल्ली विचार बाजूला सारावा. कामात चालढकल करू नका.
  • वृषभ:-
    मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्याल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. भावंडांची मदत मिळेल. घरातील गोष्टींकडे आधी लक्ष द्यावे. गप्पांमधून मैत्री दृढ कराल.
  • मिथुन:-
    पराक्रमाला चांगला वाव आहे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. नसत्या फंदात पडू नका.
  • कर्क:-
    फावल्या वेळेत जुनी कामे काढाल. उधळपट्टी करू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
  • सिंह:-
    कामाचा व्याप वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे. काही कामे वेळ वाया घालवतील. श्रमामुळे थकवा जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.
  • कन्या:-
    पैसा चुकीच्या ठिकाणी वापरू नका. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नये. चैनीत वेळ घालवाल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. नवीन कला शिकता येतील.
  • तूळ:-
    कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. कालाकुसरीत अधिक गुंतून पडाल. मोठ्या व्यक्तींची मदत मिळेल. सतत खटपट करावी लागेल. परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
  • वृश्चिक:-
    सामाजिक दर्जा सुधारेल. कार्यालयात कौतुकास पात्र व्हाल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. सरकारी कामात गुंतून पडाल. आपल्या अधिकाराचा योग्य वापर करावा.
  • धनु:-
    घरातील वातावरण प्रसन्न असेल. लहान मुलांमध्ये रमाल. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. गप्पांमधून मैत्री वाढीस लागेल. योग्य संधीची वाट पहावी.
  • मकर:-
    उगाचच चिडचिड करू नये. लहान-सहान गोष्टी नजरेआड कराव्यात. जवळचा प्रवास मजेत होईल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. मनाजोगे पुस्तक वाचायला मिळेल.
  • कुंभ:-
    जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मतभेदाला मनातून दूर सारावे. अचानक धनलाभ संभवतो. हातातील कामे वेळेत पूर्ण होतील. आवडते पदार्थ चाखाल.
  • मीन:-
    दिवस प्रसन्नतेत जाईल. चित्त चांचल्य जाणवेल. मुलांच्या आनंदाने भारावून जाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जनसंपर्कात भर पडेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर