1. मेष:-
    शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
  2. वृषभ:-
    उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडीलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
  3. मिथुन:-
    वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.
  4. कर्क:-
    आरोग्याची काळजी घ्यावी. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल.
  5. सिंह:-
    घरातील कामात व्यग्र राहाल. मुलांचा धीटपणा वाढेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल.
  6. कन्या:-
    जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
  7. तुळ:-
    आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवासात काही अडचणी जाणवतील. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. उगाच चिडचिड करू नका.
  8. वृश्चिक:-
    आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.
  9. धनु:-
    कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा संभवतो.
  10. मकर:-
    गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकार वाणीने वावराल.
  11. कुंभ:-
    श्रम अधिक वाढू शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अतिविचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.
  12. मीन:-
    इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर