• मेष:-
    जवळचा प्रवास घडेल. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आवडत्या गोष्टी करण्यावर भर दयावा. अतिविचारात गुंतून पडू नका. वाचनाने आनंद मिळेल.
  • वृषभ:-
    आवडी-निवडी बाबत सतर्क राहाल. घरातील कामात दिवस जाईल. नातेवाईकांची वर्दळ वाढेल. सर्वांचे हौसेने कराल. गप्पागोष्टींचा आनंद घ्याल.
  • मिथुन:-
    मनाची व्यग्रता दूर सारावी. चौकसपणे विचार करावा. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. दिवस हसून-खेळून घालवाल. प्रगल्भ विचार व्यक्त कराल.
  • कर्क:-
    कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील शांतता जपावी. तुमच्यातील संयम वाढवावा लागेल. अति घाई करू नका. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका.
  • सिंह:-
    मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन ओळखी होतील. कामाचा आनंद मिळेल. व्यापारीवर्ग खुश असेल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
  • कन्या:-
    बोलताना शब्दांना आवर घालावी. फार चिडचिड करू नये. तिखट व तामसी पदार्थ खाणे पसंद कराल. फसवणुकीपासून सावध राहावे. भडक शब्दांत मत मांडू नका.
  • तूळ:-
    इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाची दगदग राहील. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
  • वृश्चिक:-
    कामाचा व्याप वाढेल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्य वाढेल. कामातून चांगला धनलाभ होईल.
  • धनु:-
    प्रवासात सतर्कता ठेवावी. नातेवाईकांचे प्रश्न भेडसावतील. सर्वांशी सलोख्याने वागावे. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. आवश्यक तेथे बदल करावेत.
  • मकर:-
    हाताखालील लोकांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनापासून कामाचा आनंद घ्याल. जोडीदाराविषयी गैरसमज करून घेऊ नका. व्यसनांपासून दूर राहावे. इतरांच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नका.
  • कुंभ:-
    दिवस हसतखेळत घालवाल. आवडते छंद जोपासाल. पैज जिंकण्याचा मनसुबा ठेवाल. करमणुकीकडे अधिक लक्ष राहील. मोठ्या लोकांची गाठ पडेल.
  • मीन:-
    दिवसभर व्यग्र राहाल. वादात अडकू नका. मनातील चुकीचे समज बाजूला सारवेत. बागेत काम करण्यात वेळ घालवाल. सामाजिक वजन लक्षात घ्यावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर