मेष:-काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.

वृषभ:-गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.

मिथुन:-कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.

कर्क:-नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल. थोडी काटकसर करावी लागेल. दिवस मध्यम फलदायी.

सिंह:-जुने आजार अंगावर काढू नका. व्यापार्‍यांना हा‍तमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

कन्या:-घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.

तूळ:-कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

वृश्चिक:-कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका. समस्यांचे निराकरण शक्य.

धनू:-घरातील वातावरण शांत ठेवा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका.

मकर:-घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. प्रवास जपून करावा.

कुंभ:-गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.

मीन:-व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर