1. मेष:-
    भागिदारीतून चांगला फायदा होईल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. ओळखीचा चांगला लाभ होईल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल.
  2. वृषभ:-
    उगाच चिडचिड होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वासाने कामे करावीत. कफाचा त्रास जाणवेल. ठामपणा ठेवावा लागेल.
  3. मिथुन:-
    कलेचा मनापासून आनंद घ्याल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. मुलांशी सुसंवाद साधावा. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी.
  4. कर्क:-
    सहकुटुंब सहलीचे आयोजन कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामाला अपेक्षित गती येईल. मुले खेळात प्राविण्य मिळवतील. तुमची धिटाई वाढेल.
  5. सिंह:-
    जवळचा प्रवास मजेत करता येईल. जमिनीच्या व्यवहारात लाभ संभवतो. मुलांची प्रगती दिसून येईल. घरातील किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.
  6. कन्या:-
    कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अंगीभूत कला जोपासता येईल. कामातील उत्साह वाढेल. अधिक उर्जेने कामाला लागाल. तुमचा मान वाढेल.
  7. तूळ:-
    आवडत्या कामात मन रमवाल. दिवस स्वछंदतेत जाईल. खर्च वाढू शकतो. ऐषारामाच्या कल्पनेत रमून जाल. व्यावसायिक लाभ उत्तम राहील.
  8. वृश्चिक:-
    अडचणीतून मार्ग काढता येईल. स्वत:च्या मतावर ठाम राहाल. घरात मंगल कार्य घडेल. हातातील अधिकार वापरता येतील. मित्र मंडळ जमवाल.
  9. धनू:-
    शांततेने मार्ग काढाल. कौटुंबिक खर्च वाढेल. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल. त्रासातून मार्ग निघेल. जबाबदारीची जाणीव ठेवा.
  10. मकर:-
    कामाचा व्याप वाढू शकतो. काही वेळ स्वत:साठी द्यावा. कामाचा उरक वाढवाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. रेंगाळलेली घरगुती कामे पूर्ण होतील.
  11. कुंभ:-
    कलाकुसरीकडे ओढ वाढेल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. मानापमान मनावर घेऊ नका. योग्य वेळेची वाट पहावी. सामाजिक कार्यात हातभार लावाल.
  12. मीन:-
    रेस सट्टा यांतून फायदा संभवतो. कामाचे योग्य मूल्यमापन करावे. थोरांचे सहकार्य लाभेल. मोठ्या लोकांत उठ-बस वाढेल. वरिष्ठांना खूष करावे.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 19 january 2020 aau
First published on: 19-01-2020 at 01:00 IST