News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, १९ जुलै २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-मानसिक व्यग्रता जाणवेल. अति विचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

वृषभ:-वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील.

मिथुन:-मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.

कर्क:-लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

सिंह:-जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

कन्या:-अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. बोलक्या व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

तूळ:-सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:-जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल.

धनू:-मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. भुलथापांना भुलून जाऊ नका.

मकर:-उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल.

कुंभ:-स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.

मीन:-वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 19th july 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, १८ जुलै २०२०
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जुलै २०२०
3 आजचे राशीभविष्य, गुरूवार, १६ जुलै २०२०
Just Now!
X