News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, १ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.
  • वृषभ:-व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवा. मानसिक स्थिरता बाळगावी.
  • मिथुन:-उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. सुप्त चळवळेपणा कामाला लावा.
  • कर्क:-कामाची घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल.
  • सिंह:-खेळाडूंना चांगली संधी मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वास जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.
  • कन्या:-घरातील वातावरण शांत ठेवावे. स्थावरच्या कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
  • तूळ:-वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.
  • वृश्चिक:-संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात.
  • धनू:-घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
  • मकर:-वडिलधाऱ्यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.
  • कुंभ:-कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.
  • मीन:– उत्साही राहाल. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:50 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 1st march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ फेब्रुवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X