27 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २० ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  गोडीगुलाबीने कामे कराल. हस्तकलेला वेळ काढावा. आवाजात मार्दवता ठेवावी. वक्तृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल. काहीसा विसरभोळेपणा जाणवेल.
 • वृषभ:-
  मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भावंडांची काही कामे अंगावर पडतील. तुमच्यातील कलागुण दिसून येतील. वाणीत मधुरता ठेवाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
 • मिथुन:-
  कामात चालढकल करू नका. भारंभार कामे वाढवून ठेवू नका. जोडीदाराचा समजूतदारपणा दिसून येईल. प्रगल्भपणे विचार करावा. कलागुण सादर करण्याची संधी मिळेल.
 • कर्क:-
  भावनेला आवर घालावी. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. चांगले वाहन सौख्य लाभेल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.
 • सिंह:-
  शाब्दिक चकमक टाळावी. फार तिखट, तामसी पदार्थ खावू नयेत. इतरांच्या मदतीला धावून जाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल. घरात सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
 • कन्या:-
  पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. हट्टीपणा करून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टी फार ताणू नका. कौटुंबिक जबाबदारी घ्यावी लागेल.
 • तूळ:-
  कामाच्या व्याप वाढेल. आर्थिक लाभ चांगला संभवतो. जनविरोधाला सामोरे जावू नका. चुकीचे समाज त्रासदायक ठरू शकतात. फार काळजी करत बसू नका.
 • वृश्चिक:-
  चोरांपासून सावध राहावे. सर्व गोष्टीत गुप्तता पाळाल. काही चांगल्या संधी चालून येतील. त्यागाचे महत्त्व जाणून घ्यावे. जवळच्या नातेवाईकांची चौकशी करावी.
 • धनु:-
  घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. घरासाठी सुशोभिकरणाच्या वस्तू खरेदी कराल. महिला मौल्यवान वस्तू खरेदी करतील.
 • मकर:-
  वडिलांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. कामातील स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. संपर्क क्षेत्रातील व्यक्तींना चांगला फायदा संभवतो. अंगच्या कलागुणांना वाव द्यावा. कमिशन मध्ये चांगला फायदा होईल.
 • कुंभ:-
  पैजेवर पैसे लावताना सतर्क राहावे. चुकीच्या संगतीत अडकून पडू नका. आपण घेत असलेली मेहनत योग्यदिशेने आहे का ते तपासावे. करमणुकीचे कार्यक्रम पहाल. दिवस चैनीत घालवाल.
 • मीन:-
  कौटुंबिक गैरसमजाला मनात थारा देवू नका. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. विचार भरकटू देवू नका. मित्रांशी मतभेद वाढवू नका. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:01 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 20 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X