24 November 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २० सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधि मिळेल. नवीन ओळख होईल.

वृषभ:-घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.

मिथुन:-सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.

कर्क:-गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

सिंह:-मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या:-बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

तूळ:-जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.

वृश्चिक:-मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.

धनू:-तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.

मकर:-व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.

कुंभ:-नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.

मीन:-घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 20 september 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, गुरूवार, १७ सप्टेंबर २०२०
Just Now!
X