27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २२ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मानसिक व्यग्रता जाणवेल. काही कामांमध्ये अडकून पडाल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. आधी महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. भावंडांना सहकार्य करावे.
 • वृषभ:-
  घरगुती जबाबदा-या समर्थपणे पेलाल. क्षुल्लक कारणांवरून चिडू नका. वेळेचे योग्य नियोजन करावे. वैचारिकता बदलून पहावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतूक कराल.
 • मिथुन:-
  चाल-ढकल करण्यात वेळ वाया घालवू नका. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. हसून वेळ मारून न्याल. नसते धाडस करू नये. खर्च वाढू शकतो.
 • कर्क:-
  भावनेच्या आहारी जाणे टाळावे. चुकीच्या कल्पनांना खत-पाणी घालू नका. बोलतांना सारासार विचार करावा. कौटुंबिक गोष्टी सामोपचाराने सोडवाल. अंगीभूत कलांचे कौतुक केले जाईल.
 • सिंह:-
  परिस्थितीशी जुळवून घ्यावे. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. कामातील अडचण संयमाने दूर करावी. किरकोळ दुखापतीकडे लक्ष द्यावे. दृढ निश्चय कराल.
 • कन्या:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. बढतीचे योग आहेत. गायन कलेचे कौतुक केले जाईल. गोड बोलून वेळ मारून न्याल. कामाचा थकवा जाणवेल.
 • तूळ:-
  चार माणसात वावरतांना आपली प्रतिष्ठा जपावी. व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पावूल उचलाल. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल. नवीन कापडे खरेदी कराल.
 • वृश्चिक:-
  काम करण्याची पद्धत बदलून पहावी. वडिलांची नाराजी दूर करावी. कामात सुसंगतता ठेवावी. काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागेल. तुमच्यातील धडपड दिसून येईल.
 • धनु:-
  वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. उपासनेवर अधिक लक्ष द्यावे. थोर व्यक्तींचा सल्ला घ्यावा. इतरांच्या वागण्याचा विचार करत बसू नका. गुरुजानांवरील श्रद्धा वाढेल,
 • मकर:-
  पाठीचे विकार त्रासदायक ठरू शकतात. उगाचच नसते विचार करत वेळ वाया घालवू नका. अडथळ्यातून मार्ग शोधावा. वारसाहक्काच्या कामात खंड पडू शकतो. चुकीचा मार्ग पकडू नका.
 • कुंभ:-
  जोडीदाराविषयी मतभेदाला मनात थारा देवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. जुगारापासून दूर राहावे. पित्ताचे त्रास संभवतात. वरिष्ठांशी मतभेद होवू शकतात.
 • मीन:-
  जोडीदाराची प्राप्ती वाढू शकते. वैवाहिक सौख्यात भर पडेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनातून निराशा बाजूला सारावी. अपचनाचा त्रास संभवतो.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 22 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २१ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९
Just Now!
X