मेष

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुलस्वामिनी आणि कुलदैवताचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. कुलदैवतेचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. ओम इंद्राग्निभ्यो नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

सिंह

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासोबत छोट्या प्रवासाचे योग. कालभैरवाचे दर्शन घ्यावे
आजचा रंग – हिरवा

कन्या

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. धाडसी निर्णयाचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवताल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. ओम हरये नमः जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

धनु

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाची उपासना करावी.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. ओम हरये नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

मीन

आज संध्याकाळी ७.५७ पर्यंत चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu