• मेष:-
    कौटुंबिक सौख्यात रमाल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ कारणांवरून वाद संभवतात. चर्चेतून समस्या सोडवाव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे.
  • वृषभ:-
    जोडीदाराचा वरचष्मा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार हातात येतील. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. अचानक धनलाभाची शक्यता. पित्ताचा त्रास जाणवेल.
  • मिथुन:-
    वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. एकमेकांची बाजू उत्तमरित्या समजून घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमचा रुबाब असेल. गप्पांमधून मैत्री दृढ होईल.
  • कर्क:-
    घरातील कामे वाढतील. स्थावरची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. वाहन विषयक कामे पार पडतील. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी.
  • सिंह:-
    भावंडांना मदत कराल. जवळचा प्रवास कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. हातातील कलेकडे लक्ष द्यावे.
  • कन्या:-
    दिवसभर कामाचा ताण राहील. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मानसिक व्यग्रता जाणवेल. घरात धार्मिक कार्यक्रम होईल. हातातील कामात यश येईल.
  • तूळ:-
    डोक शांत ठेवून कामं करावीत. घाईघाईने कुठलीही गोष्ट करू नका. अघळपघळ बोलू नका. कौटुंबिक खर्च वाढेल. क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालू नका.
  • वृश्चिक:-
    अडचणींवर मात कराल. शारीरिक श्रम वाढतील. चिकाटी सोडू नका. मनाची चंचलता जाणवेल. काही कामे एकाच गोष्टीवर अडून पडतील.
  • धनु:-
    मनातील इच्छेला महत्व द्यावे. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. योग्य संधीची वाट पाहावी. चटकन निराश होऊ नका. पत्नीचा प्रेमळ हट्ट पुरवावा.
  • मकर:-
    व्यापाऱ्यांना चांगला लाभ संभवतो. हातात नवीन अधिकार येतील. कामाची धांदल उडेल. मुलांचे कौतुक कराल. काही गोष्टी क्षणिक आनंद देतील.
  • कुंभ:-
    सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. घरातील मोठ्या व्यक्तींचा मान राखावा. प्रवासात सतर्क राहावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
  • मीन:-
    मुलांच्या कारवायांवर वेळोवेळी लक्ष ठेवा. गैरसमजाला मनातून काढून टाका. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील कामाला गती मिळेल. अचानक धनलाभ संभवतो.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर