25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २५ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  तुमच्या मताला दुजोरा दिला जाईल. उत्तम मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवास मजेत होईल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आवडीचे पदार्थ खाल.
 • वृषभ:-
  दिवस प्रसन्नतेत घालवाल. कामात मनाजोगे यश येईल. भावंडांचे सौख्य लाभेल. उगाचच होणारी चिडचिड टाळावी. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.
 • मिथुन:-
  सार्वजनिक कामात मदत कराल. जामीनीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. चोरांपासून सावध राहावे. फार काळजी करत बसू नये. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा.
 • कर्क:-
  मित्रमंडळींच्या गोतावळ्यात रमाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. आर्थिक चिंता मिटेल. कामात आळशीपणा करू नये. काहीशी चैन करण्याकडे कल राहील.
 • सिंह:-
  कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आर्थिक लाभावर लक्ष द्याल. सामाजिक वजन वाढेल. कामाचा थकवा जाणवेल.
 • कन्या:-
  तुमचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. आर्थिक अडचण दूर होईल. मदतीचा आंनद मिळवाल. निराशा दूर सारावी. खर्चाला आवर घालवी.
 • तुळ:-
  अचानक लाभ होतील. कामाच्याबाबतीत संयम राखावा लागेल. काही कामे पुढे ढकलली जातील. कौटुंबिक समाधान लाभेल. व्यावसायिक वाढीचा विचार करावा.
 • वृश्चिक:-
  कौटुंबिक सौख्य वाढेल. भागीदारीतून चांगला फायदा संभवतो. एकमेकातील आकर्षण वाढीस लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद घ्याल.
 • धनु:-
  नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमाल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील. इतरांवर अवलंबून राहू नका. मित्रांची मदत मिळेल. मनाची विशालता दाखवाल.
 • मकर:-
  प्रेमसौख्याला उधान येईल. मैत्री अधिक दृढ होईल. करमणुकीची मजा घ्याल. तुमचा जनसंपर्क वाढेल. आपले मत योग्य प्रकारे मांडू शकाल.
 • कुंभ:-
  थोरामोठ्यांचा आशिर्वाद मिळेल. आत्मिक आनंदावर भर द्याल. मानसिक समाधान लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल.
 • मीन:-
  कामावर चांगले लक्ष केंद्रित करता येईल. लिखाणाला अधिक उर्जा मिळेल. प्रवास सुखाचा होईल. कामाचा मोबदला चांगला मिळेल. भावंडांमधील आपुलकी वाढीस लागेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on August 25, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 25 august 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ ऑगस्ट २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २३ ऑगस्ट २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २२ ऑगस्ट २०१९
Just Now!
X